Nitesh Rane | ‘…तो वाघ नसतो, त्याला पालतू कुत्रा म्हणतात’, वडेट्टीवारांच्या विधानावरुन राणेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Congress leader Vijay Vadettiwar) यांनी लोणावळ्यात (Lonavala) पार पडलेल्या ओबीसी (OBC) चिंतन बैठकीत शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला होता. विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या विधानावरुन भाजपचे नेते नितेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘…तो वाघ नसतो, त्याला पालतू कुत्रा म्हणतात’

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत म्हटले की, मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ (Tiger) चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये (Circus) असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा (Pet Dog) म्हणतात, असं नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे. तसेच बाकी समझदारोंको इशारा काफी है, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरुन लोणावळा ((Lonavala) येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची (OBC leaders) परिषद (Council) भरवण्यात आली होती. यामध्ये बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मी अशा भागात राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. या मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी एक वाघ नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडेही पाठवा असं सांगितले. त्यावर विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला होता.

हे देखील वाचा

Sanjay Raut | संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले – ‘तुमचे राजकीय भविष्य उज्वल, आम्ही तुम्हाला संन्यास घेऊ देणार नाही’

जम्मूमध्ये आढळले ड्रोन, हाय अलर्ट जारी

Pune Crime News | पुण्यात तरूणीनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरूणाचा रेकॉर्ड केला नग्नावस्थेतील व्हिडीओ, उकळले पैसे

Indapur News | भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुपुत्राचा ज्येष्ठ शिक्षकाशी वाद; ऑडिओ क्लिप व्हायरल, इंदापूर तालुक्यात खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : nitesh rane has indirectly criticized shiv sena said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update