राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पोलिसनामा ऑनलाईन टीम- राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू, ‘ असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवीन राजकीय समीकरणे जुळविली जाणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप (BJP) व शिवसेनेकडून राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे खंडन करण्यात आले आहे. सामनासाठी फडणवीस यांची मुलाखत बिहार निवडणुकीनंतर होणार असून त्याचे प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेना (Shiv Sena) -भाजपमधील गेले वर्षभर ताणले गेलेले व तुटलेले संबंध पुन्हा जुळविण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले, ही भेट मुलाखतीसंदर्भातच होती आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हे सरकार पाडण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीतूनच पडेल, असा मला विश्वास आहे. सरकार पडल्यावर काय करायचे ते पाहू. भाजप (BJP ) विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM ) राहतील. सरकारची ही व्यवस्था कायम राहील, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like