‘सुशांतच्या कुटुंबातील कुणीही त्याचा मित्र संदीप सिंहला ओळखत नाही’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर निर्माता संदीप सिंह यानं सर्वात आधी साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. काही फोटो आणि व्हिडीओदेखील समोर होते ज्यात तो सुशांतच्या बहिणीचं सांत्वन करताना दिसला होता. परंतु सुशांतच्या कुटुंबातील कुणीही संदीप सिंहला ओळखत नाहीत असा खुलासा सुशांतच्या फॅमिली फ्रेंडनं केला आहे.

सुशांतच्या फॅमिली एका मुलाखतीत बोलताना फ्रेंडनं सांगितलं की, “सुशांतचं पार्थिव कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी संदीप सिंहनंच जोर दिला होता. संदीपचा पीआरच सुशांतच्या बहिणीसोबत फोटो काढत होता. सुशांतच्या जवळच्या मित्रांनाही संदीप सिंह कोण आहे हे माहित नाही असं या फ्रेंडनं सांगितलं आहे.

पुढे बोलताना या फॅमिली फ्रेंडनं सांगितलं की, काही वर्षांपूर्वी संदीप सुशांतच्या खूप क्लोज होता. सुशांतच्या घरी गेल्यांतर संदीपच सर्वांना आदेश देत होता. संदीप सिंहनं कित्येकदा त्याचे स्टेटमेंट बदलले आहेत असा खुलासाही या फॅमिली फ्रेंडनं केला आहे. संदीपनं सुशांतबद्दल आजवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. संदीपचा दावा आहे की, तो, सुशांत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे एकाच अपार्टमेंटमध्ये रहात होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like