‘या’ 3 शास्त्रज्ञांना ‘सर्च इन फिजियोलॉजी’साठी मिळाला नोबेल पुरस्कार !

स्टोकहोम : वृत्तसंस्था – नोबेल पुरस्कारांच्या यादीतील विजेत्यांची नावं जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाचं शरीरविज्ञानशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक विल्यम जी. केलिन जूनियर, सर पीटर जे. रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेन्झा यांना संयुक्तपणे जाहीर झालं आहे. पेशींच्या ऑक्सिजन अंतर्ग्रहणाच्या शोधाबद्दल त्यांची या पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे.

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. डायनामाइटची निर्मिती करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ साहित्य, शांतता, अर्थशास्त्र, आरोग्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं.

Visit : Policenama.com