Nokia C3 भारतात ‘लॉन्च’, किंमत 7,499 रुपयांपासून सुरू, 1 वर्षाची ‘रिप्लेसमेंट’ गॅरंटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एचएमडी ग्लोबलने Nokia C3 भारतात लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन असून त्याची किंमत 7,499 रुपयांपासून सुरू होते. त्याचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 2GB रॅमसह 16GB चे स्टोरेज आहे, तर दुसर्‍या व्हेरिएंटमध्ये 3GB रॅमसह 32GB चे स्टोरेज आहे.

Nokia C3 ची विक्री 17 सप्टेंबरपासून सुरू होईल. नोकियाच्या वेबसाइटवर 10 सप्टेंबरपासून याची प्री बुकिंग सुरू होईल. तसेच कंपनीने म्हटले आहे यासोबत 1 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देण्यात येईल.

Nokia C3 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Nokia C3 मध्ये 5.99 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे आणि आयपीएस पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर Unisoc प्रोसेसर दिले गेले आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी एकच रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलचा आहे. यात एलईडी फ्लॅश देण्यात आला असून सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Nokia C3 मध्ये मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G LTE सह एफएम जीपीएस, मायक्रो यूएसबी, हेजफोन जॅक सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. Nokia C3 मध्ये डेडिकेटेड गूगल असिस्टंटसाठी एक बटन देण्यात आले आहे. या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. फोनची बॅटरी 3,040mAh ची आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की हा फोन सिंगल चार्जवर 50 तासांचा टॉकटाइम देऊ शकतो. स्टँडबायसाठी कंपनीने असे म्हटले आहे की हा 16.5 दिवसांपर्यंत टिकू शकतो.