हत्या करण्याआधी मित्रानं बनवला TikTok व्हिडीओ, एकाच मुलीवर करत होते दोघं प्रेम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   12 वी मध्ये शिकत असलेले दोन मित्र एकाच मुलीच्या प्रेमात पडले तेव्हा एकाने दुसर्‍याला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी धोकादायक कट रचला. टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली हत्येचे संपूर्ण सीन व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले आणि त्यानंतर त्याच प्रकारे खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना पंजाबच्या जालंधर शहरातील आहे. जालंधर कॅंट लालकुर्ती बाजारात सोमवारी संध्याकाळी 17 वर्षाच्या मुलाच्या हत्येनंतर 24 तासांच्या आत पोलिस आयुक्तांनी मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आणले. मृत अरमानच्या एका मित्राला अटक केली जो अल्पवयीन आहे.

अशोक कुमार यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा नातू अरमान छावणीतील केव्ही -4 शाळेत बारावीत शिकत होता. त्याचे वडील फ्रान्स मूळचे एनआरआय होते. तिथे असताना आई आपल्या मुलीसह हिमाचल प्रदेशला गेली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि अरमानचा मित्र असलेल्या किशोरला अटक केली. पोलिस आयुक्त गुरप्रीतसिंग भुल्लर यांनी सांगितले की, अरमान आणि त्याचा आरोपी मित्र दोघेही एकत्र शिकत होते. एका अल्पवयीन मुलीसोबत अरमानची मैत्री होती त्याचबरोबर आरोपी मित्राला देखील ती मुलगी आवडत होती त्यामुळे अरमान वर त्याचा राग होता.

अरमानच्या मित्राने नियोजित पद्धतीने हा गुन्हा घडवून आणला. आरोपीने क्रिकेट बॅटने पीडितेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. अरमानची हत्या करण्याआधी त्याच्या मित्राने टिकटॉक व्हिडिओ देखील बनवला. अरमानला माहित नव्हते की, टिकटॉक व्हिडिओ बनवून त्याचाच मित्र त्याच्या हत्येविषयी कट रचेल. जालंधर छावणी पोलिसांनी अशोक कुमार याच्या तक्रारीवर आयपीसी विभाग कलम 302, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते म्हणाले की, आरोपी किशोरला कोर्टात हजर केले जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like