मुंबईहून आणलेल्या ट्रकमधील ऑईल परस्पर काढून घेतलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कंपनीतील व्यक्तीनेच मुबईवरुन आणलेल्या टेम्पोमधील ऑईल काढून फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अब्दुलकलाम सौदागर चौधरी (वय 28, रा. मुंबई) याला पोलीसांनी अटक केली आहे. 31 वर्षीय व्यक्तीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुंढवा परिसरात कंपनी आहे. त्याठिकाणी फिर्यादी हे नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांच्या कंपनीला लागणारे ऑईल मुंबई येथून आणतात. एकाचवेळी काही टन ऑईल मागविले जाते. त्यानुसार, त्यांनी शिवडी येथून फर्नेस ऑईल ज्युपीटर पेट्रोल केमीकलचा एक टँंकर मागविला होता. मात्र, त्यावेळी आरोपीने परस्पर हा टँकर पुण्यात आल्यानंतर कात्रज परिसरात थांबविला.

साथीदाराच्या मदतीने तेथे टँकरचे सिल तोडून त्यातील 3 टन ऑईल काढून घेतले. यानंतर टँकर कंपनीत पाठविला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com