OMG : साडी परिधान करून बॅट घेऊन पिच वर पोहोचली ‘ही’ महिला ‘क्रिकेटपटू’, ‘या’ मजेदार शैलीत केला फोटोशूट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएलचा हंगाम सुरू आहे. ज्यात क्रिकेट आणि त्यासोबतच आहे भरपूर थरार. परंतु आयपीएलबरोबरच यावर्षी विवाह सोहळ्यांचा हंगाम देखील सुरू झाला आहे. आता लग्नाच्या मोसमात क्रिकेटच्या फीवरची जुगलबंदी होईल म्हटल्यावर त्याचा परिणाम तर दिसून येईलच आणि असेच घडले जेव्हा एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने क्रिकेटचा फील घेत आपल्या वेडिंग फोटो शूट केला.

साडीमध्ये फलंदाजी करत केला फोटोशूट

क्रिकेट खेळण्याच्या शैलीमध्ये वेडिंग फोटो शूट करणारी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ही बांग्लादेशची महिला क्रिकेट टीमची सदस्य संजीदा इस्लाम आहे. उजव्या हाताची फलंदाज संजीदाने आपला वेडिंग फोटो शूट आपल्या आवडत्या फलंदाजीच्या स्टाईलमध्ये केला आणि ते ही साडी नेसून आणि खास गोष्ट म्हणजे हा फोटो शूट आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

18 ऑक्टोबर रोजी झाले लग्न

संजीदा इस्लाम ही बांग्लादेशच्या रंगपूरची रहिवासी आहे. तिने रंगपूर येथील एका फर्स्ट क्लास क्रिकेटर मीम मोसाडेकशी लग्न केले आहे. दोघांनी 18 ऑक्टोबरला लग्नाची गाठ बांधली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटर वेड्स फर्स्ट क्लास क्रिकेटर

23 वर्षीय क्रिकेटपटू संजीदा इस्लामने बांग्लादेशकडून आतापर्यंत 16 वनडे आणि 54 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात तिच्या नावे 174 धावा आहेत तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 520 धावा आहेत. संजीदा ही ओपनर आहे, जिने आपला इंटरनॅशनल डेब्यू 16 व्या वर्षी आयर्लंडविरुद्ध टी-20 पासून केला. त्याच वेळी मीम मोसाडेकने रंगपूर डिव्हिजन आणि ढाका फर्स्ट डिव्हिजनकडून क्रिकेट खेळले आहे, त्याशिवाय मीमने रूपगंज पार्टेक आणि उद्याेचल क्लबकडूनही क्रिकेट खेळले आहे. मीम हा मॅनेजमेंट पदवीधर आहे.