पार्थ पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘पुरोगामी’त्वाची ‘ऐसी तैसी’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळचे उमेदवार पार्थ पवार हे पहिल्या भाषणापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होत आहेत. त्यांचे पहिले भाषण, उलट्या रेल्वेने प्रवास करणे, मुंबई महामार्ग मावळ मधून जात असल्याने मावळातून निवडणूक लढवत असल्याचे सांगितल्याने पार्थ पवार आगोदरच ट्रोल झाले आहेत. पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. पार्थ पवार यांनी दापोडीतील विनियार्ड चर्चचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हेवे आणि जयश्री सिल्व्हेवे यांची शनिवारी भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे ते पुन्हा ट्रोल होऊ लागले आहेत.

पार्थ पवार प्रचारासाठी दापोडीतील विनियार्ड चर्चमध्ये शनिवारी सांयकाळी ७ च्या सुमारास आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शहराध्याक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेवक रोहित काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते.

‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ असे आशीर्वाद फादर डेव्हिड यांनी दिले. असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर डेव्हिड दाव करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्य़कर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या धर्म गुरुची भेट घेतल्याने पार्थ पवार पुन्हा एका एकदा ट्रोल होत आहेत.

Loading...
You might also like