कांद्यानं पुन्हा आणलं डोळयात पाणी ! 80 रूपयांवर पोहचले दर, जाणून घ्या भाव वाढण्याचं कारण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एका महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोमावारी किरकोळ बाजारात कांदा 70-80 रुपये किलोने विकल्या गेला. व्यापाऱ्यांच्या मते बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात अशीच वाढ झाली होती.

सरकारला लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक ठिकाणी कांदे विक्री करावी लागली होती. आता नोव्हेंबरमध्ये देखील हीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे.

सरकारच्या प्रयत्नाने दोन दिवस कांद्याचे भाव उतरले होते परंतू सोमवारी लासलगांव मंडईत कांद्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चार वर्षानंतर ही वाढ उच्च स्तरावर जाऊन 55.50 रुपये प्रति किलोग्रॅमवर गेले.

सध्या कांद्याचे भाव किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलोग्रॅम दरम्यान आहेत आणि लवकरच आवक कमी असल्याने 100 रुपयांच्या पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Visit : Policenama.com