कामाची गोष्ट ! फक्त 48 तासात कर्ज देते ‘ही’ कंपनी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर पीअर-टू-पीअर (पी 2 पी) प्लॅटफॉर्म आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI ) देखरेखीखाली अनेक कंपन्या या प्लॅटफॉर्मशी संलग्न आहेत. यापैकीच  एक स्टार्टअप कंपनी ‘फिंजी’ आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आपण 48 तासांच्या आत कर्ज घेऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता तुम्हाला बँकेत जाण्याचा त्रास कमी होईल आणि  सीआयबीआयएलच्या कमी स्कोअरमुळे कर्ज नाकारले जाईल असा कटकटींपासून मुक्तता मिळेल. फिंजी कंपनीला आरबीआयने 2018 मध्ये परवाना दिला होता.

असा  अर्ज करा –

कर्जा मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी  https://finzy.com/borrow या लिंकवर जा.
लिंक ओपन केल्यावर कर्जाची रक्कम, कर्ज घेण्याचे कारण आणि कर्जाचा कालावधी याबद्दल तपशील भरा.

पॅन-मोबाइल व ईमेलचे  व्हेरिफिकेशन  करा.

पुढील स्टेपमध्ये  इतर काही माहिती विचारली जाईल. तसेच अ‍ॅड्रेस प्रूफसह इतर कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. याशिवाय बँकेचे डिटेल्सही  द्यावे  लागतील.

यानंतर कागदपत्रे आणि इतर गोष्टींची समीक्षा करून  कर्जाची रक्कम 48 तासांच्या आत हस्तांतरित केली जाईल. याशिवाय अत्यंत कमी मासिक ईएमआयच्या सुविधेचा लाभ घेता येतो. तसेच कोणताही दंड आणि गुप्त शुल्काशिवाय संपूर्ण किंवा काही प्रमाणात कर्जाची परतफेड करण्याचा एक पर्याय देखील मिळतो.

कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट
– पॅन कार्ड
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– मागील वर्षी आयटी रिटर्न / फॉर्म 16
– मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
– मागील 3 महिन्यांच्या पगाराची स्लिप
– ई-आधार किंवा करंट एड्रेस प्रूफ

फिंजी बद्दल –

पीअर-टू-पीअर लेंडर फिंजी प्लॅटफॉर्मची सुरूवात अमित मोरे, अभिनंदन संगम, विश्वास दीक्षित आणि अपूर्व गावडे या 4 मित्रांनी केली होती. 2018 मध्ये, फिंजीला आरबीआयचा परवाना मिळाला.

Visit : Policenama.com