ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, बड्या हॉटेलमधून तिघे ताब्यात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ऑनलाइन देहविक्री करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून दोन तरुणींची यातून सुटका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालत असे. सोशल मोडियाच्या माध्यमातूम तरुणींचे फोटो पाठवून हे ऑनलाईन सेक्स रॅकेट चालत असे. यामध्ये विदेशी तरुणींकडून देखील देहविक्रय करून घेतला जात असल्याची माहिती उघड झाली आहे.

इंटरनेटवर सांकेतिक शब्दांच्या माध्यमातून देहविक्रीय केला जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. सर्व व्यवहार ऑनलाईन असल्यामुळे पोलिसांना याचा तपास करताना अडचणी येत होत्या. मात्र अखेर पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले. बोगस ग्राहक बनून पोलिसांनी या दलालांना अटक केली. पोलिसांनी या दलालाला संपर्क करून त्याच्याकडे तरुणींच्या फोटोची मागणी केली. यानंतर सर्व व्यवहार झाल्यानंतर अंधेरी पूर्वेकडील हॉटेल रॉयल इलाईट याठिकाणी एक पोलीस बोगस ग्राहक बनून गेले. त्यावेळी पोलिसांना तेथे दोन तरुणी आणि तीन तरुण सापडले. यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन या दोन तरुणींची सुटका केली.

दरम्यान,  गुल्ली नमन यादव, संतोष यादव आणि अशोक यादव  असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून बाकी फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com