‘फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर’, विधानसभा अध्यक्षांनी घेतली दखल

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून भाजपाने पहिल्या दिवसापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासह राज्यातील अनेक प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. यावरून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाच्या सत्ता काळात केवळ असंख्य आश्वासने देण्यात आली, त्यावर अंमलबजावणी झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधीमंडळातील मंत्र्यांनी असंख्य घोषणा केल्या. यापैकी अनेक घोषणा अशा आहेत, ज्यांची अंमलबजावणीच झाली नाही. या संदर्भात आपण सचिवांना जाब विचारणार आहोत. मंत्री विधीमंडळात जबाबदारीने बोलत असतात. त्यांनी दिलेली आश्वासने पाळली जातात असा संकेत आहे. या आश्वासनाचा पाठपुरावा करून अंमलबजावणी करण्याचे काम सचिवांचे असते. फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात झालेल्या या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष देणार आहे, असे पटोले म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/