Coronavirus : हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर अनेक आठवड्यानंतर देखील ‘फुफ्फुसं’ आणि हृदयावर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना मधून बऱ्या होणाऱ्या लोकांवर दीर्घकाळासाठी त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. संशोधकांच्या मते रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर अनेक आठवड्यानंतर देखील फुफ्फुसं आणि हृदयावर कोरोनाचा विपरीत परिणाम होण्याचा धोका असू शकतो. दिलासादायक बाब म्हणजे हे अवयव आपोआप बरे देखील होतात. यातून असे स्पष्ट होते की या अवयवांमध्ये असं काहीतरी तंत्र आहे जे या अवयवांना आपोआप बरं करू शकतं.

युरोपीय रेस्पेरटोरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस मध्ये प्रकाशित केलेल्या या अभ्यासानुसार, हा निष्कर्ष ऑस्ट्रियाच्या एका हॉस्पिटलमधील 86 कोरोना रुग्णांवर केलेल्या शोधनुसार काढण्यात आला आहे. यावरून समजते की कोरोना रुगणांवर हृदय आणि फुफ्फुसां संबंधित आजार दीर्घकाळापर्यंत राहू शकतात. पण अनेक रुग्णांमध्ये याच्याशी लढण्याची प्रतिकार शक्ती दिसून आली. या रुग्णांना हॉस्पिटल मधून घरी सोडल्यानंतर 6, 12 आणि 24 आठवड्यांनी त्यांना पुन्हा तपासणीसाठी बोलवण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधून घरी सोडल्यानंतर 6 आठवड्यांनी तपासणी केले असता असे दिसून आले की या रुग्णांना श्वासासंबंधी तक्रारी दिसून आल्या.

सिटी स्कॅन केलं असता 88% रुग्णांमध्ये फुफ्फुसांवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रियाच्या युनिव्हर्सिटी क्लिनिकमधील अभ्यासकांनी सांगितलं की, ‘या अभ्यासावरून असे समजते कि कोरोना रुग्णांची देखभाल त्यांना हॉस्पिटल मधून घरी सोडल्यानंतर देखील केली पाहिजे.’ कोरोना विषाणू विरोधातील वॅक्सीनवर जगातील अनेक देश संशोधन करत आहेत. सध्या जगभरत 170 वॅक्सीनवर काम सुरु आहे. अहवालानुसार यापैकी 30 वॅक्सीनचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही वॅक्सीन तयार होऊ शकेल.