पामतेलातील व्हिटॅमिन-ई ने वाढते रोगप्रतिकारशक्ती, ‘कोरोना’ काळात ठरत आहे लाभदायक

कौलालंपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पामतेल कोरोना काळात लाभदायक ठरू शकते. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, पामतेलाने प्राप्त होणारे व्हिटॅमिन-ई (vitamin E) शरीराची इम्युनिटी वाढवू शकते. पामतेल म्हणजे ताडाचे तेल व्हिटॅमिन-ई (vitamin E)ने समृद्ध असते. सोबतच यामध्ये टोकोफेरोल्स आणि टोकोट्रिनॉलसारखी कंपाउंडसुद्धा असतात. या कंपाउंडमध्ये अँटी ऑक्सिडेंट प्रभावी असतात, जे मेटाबोलिक प्रक्रियेद्वारे उत्पन्न नुकसानकारक केमिकलपासून शरीरातील पेशींचे रक्षण करतात.

टोकोफेरोल्ससारख्या कंपाउंडच्या प्रभावाबाबत योग्य माहिती उपलब्ध आहे, तर टोकोट्रिनॉलबाबत अजूनही बरेच काही जाणून घेणे, समजणे बाकी आहे. हा शोध मलेशिया आणि लीबियाच्या संशोधकांच्या एका टीमने लावला आहे. संशोधनात उंदरांच्या लिव्हर पेशींवर टोकोट्रिनॉल (ताडाच्या तेलापासून काढण्यात आलेल्या तत्वा) च्या प्रभावाची तपासणी करण्यात आली.

मलेशिया स्थित केबांगसन युनिव्हर्सिटीशी संबंधित आणि संशोधनाचे प्रमुख लेखक अजमान अब्दुल्लाह यांनी म्हटले की, न्यूक्लियसमध्ये उपस्थित एनआरएफ2 वर टोकोट्रिनॉल प्रभावाच्या वीवो अभ्यासावर सर्वप्रथम आम्ही संशोधन केले आणि आढळले की उंदरांच्या लिव्हर सेल्समधील एनआरएफ2 चे स्थानांतर आहारावर अवलंबून आहे.

संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना आढळले की, शरीरात याचा प्रभाव केवळ 60 मिनिटांत दिसू लागला. पाम ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते आणि हे इम्यून सिस्टिमला वाढवण्यात उपयोगी ठरते. हे अँटी ऑक्सिडेंट असते, शिवाय कॅन्सरच्या आजारातसुद्धा उपयोगी असते.