पाकिस्तानकडून भारतीय चाैक्यांवर फायरिंग ; भारताचंही चोख प्रत्युत्तर

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – आम्हाला शांतता हवी आहे असा कांगावा करणाऱ्या खोटारड्या पाकिस्तानच्या सीमेवरील गोळीबाराच्या कुरापती सुरूच आहेत. आज शुक्रवारी सकाळी उरी सेक्ट्ररमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. तर भारतीय सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील कमलकोटे गावात आणि भारतीय सैन्यांच्या चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. तसेच या ठिकाणी पाकिस्ताने आज सकाळी देखील गोळीबार सुरु केला. दरम्यान कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीतून दहशतवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर सुरक्षा रक्षक जवानांनी या भागात शोध मोहीम सुरु केली आहे.

भारताकडून हल्ला होण्याच्या शक्यतेने भेदरलेल्या पाकिस्तान सैन्याने मागील दोन दिवसात ४० हून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर आज पुन्हा पाकिस्तानने दोन ठिकाणी गोळीबार केला आहे. मंगळवारपासून भारताने सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारत पाक सीमेवर तणावाची स्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या –

१० हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शन च्या जाळ्यात 

नारायण राणेंच्या पक्षाला मिळाले ‘हे’ अनोखे निवडणूक चिन्ह 

पुण्यात मंडई गणपती परिसरात भीषण आग 

एटीएमला चकवा देऊन पैसे लुबाडणाऱ्या राजस्थानातील दोघांना पुण्यात अटक