PoK मध्ये ‘ब्लड बॅन्के’च्या नावाखाली ‘सेक्स रॅकेट’, ‘जमात-उत-दावा’च्या नेत्याला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –पीओकेमध्ये ब्लड बँकेच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी गट जमात-उद-दावा चा नेता सय्यद समीर बुखारी याला अटक करण्यात आली आहे. बुखारीला सेक्स रॅकट चालविण्याच्या आरोपाखाली पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) बाग शहरातून अटक करण्यात आली आहे.

बुखारी जमात-उद-दावाशी संबंधित अल-महफिज फाउंडेशन चालवतो. हे फाउंडेशन मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईदच्या नेतृत्वात जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली.
सैयद समीर बुखारी (Photo: ANI)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो बाग या शहरामध्ये असलेल्या कार्यालयात महिलांचा विनयभंग करताना दिसून आला. बुखारी हा रक्तपेढीच्या नावावर हे सेक्स रॅकेट चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुखारी हा पूर्वी जमात-उत-दावाचा प्रमुख हाफिज सईदचा खास विश्वासू होता. या भागात भारत विरोधी कारवाया आणि इतर कामे करत होता. तो अजूनही हे काम करत असल्याची माहिती मिळत आहे.जमात-उल-दावा काश्मिरी जनतेचे हितचिंतक असल्याचे सांगत होती. मात्र, या नावाच्या आड काही दिवस सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये गुंतल्यामुळे चर्चे आली. स्थानिक पोलिसांनी समीर बुखारी याला अटक केल्यानंतर जमात-उल-दावाचा खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येच नाही तर पाकिस्तानच्या इतर भागात देखील जमात-उल-दावा सक्रीय होती.