PoK बाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांच मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना बऱ्याच दिवसांनी काश्मीरची आठवण झाली आणि त्यांनी काश्मीरबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. इम्रान खानने आपल्या वक्तव्यामधून इतर देशांना आवाहन केले आहे की,तुम्ही या आणि भारत – पाक दोनीही देशांच्या काश्मीर हद्दीचा दौरा करा. मग ठरवा कोणत्या भागातील काश्मीरची परिस्थिती चांगली आहे.

लोकांनी काश्मीरमध्ये यावे
कोणत्या ठिकाणी मानव अधिकारांच्या मूल्यांचे उल्लंघन होत आहे हे तपासणे खूप सोपे आहे. आम्ही जगातील अनेक लोकांना पाकिस्तानमध्ये असलेल्या काश्मीरमध्ये बोलवतो तेच लोक नंतर भारतातील काश्मीरमध्ये जातील. परंतु लोक पाकिस्तान मधल्या काश्मीरात येऊ शकतात मात्र त्यांना भारतातील काश्मिरात जाण्याची परवानगी मिळू शकणार नाही. आमच्याकडे पारदर्श निवडणूक होतात लोक स्वतः निवड करतात. असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

चीनच्या मुसलमानांबाबत गप्प का ?
इम्रान खान जगभरातील मुसलमानांबाबत बोलतात मात्र चीनमधील मुसलमानांवर जो अन्याय केला जात आहे त्याबाबत ते आतापर्यंत काहीच बोललेले नाहीत. इम्रान खान म्हणाले की,चीनमध्ये मुसलमानांबाबत जे होत आहे त्याची तुलना काश्मीरमधील मुसलमानांशी केली जाऊ शकत नाही. चीन आमचा मित्र आहे, ज्या वेळी आम्ही आर्थिक संकटात होतो त्यावेळी चीनने आमची खूप मदत केली आहे. त्यामुळे आम्ही या बाबत सार्वत्रिक बोलण्यापेक्षा खाजगीत बोलणे पसंत करतो.

जनमत मिळवण्याचा प्रश्नच नाही
तुम्ही पाकिस्तान मधील काश्मिरी लोकांना विरोध प्रदर्शन करण्याची परवानगी देता का ? त्यावर इम्रान खान म्हणाले की,याचा निर्णय येथील लोकांनी घ्यायचा आहे. पाकिस्तान जनमत घेण्यासाठी तयार आहे. लोकांना स्वतः निर्णय घेऊद्या की त्यांना स्वतंत्र व्हायचंय किंवा पाकिस्तान सोबत रहायचं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/