बेळगावात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, ‘त्या’ तरुणांना जमावाने चोपले

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. परंतु बेळगावमध्ये कामत गल्लीत रविवारी दुपारी चार तरुणांनी पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा दिल्या. यामुळे संतप्त जमावाने चौघांनाही चोपून काढले. परंतु दोन जण पळून गेले. दोघे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

आयुब बशीर मुल्ला (१९, कलईगार गल्ली), महंमदसहेफ आय़ुब पटेल (२२, वीरभद्रनगर) यांच्यासह आणखी दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. तर त्यांना मारहाण करणाऱ्या जमावावरदेखील मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावातील कामत गल्लीत लपाकिस्तानचा निषेध करणारा आणि भारतीय जवानांचे अभिनंदन करणारे फलक लावण्याचत आले होते. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चौघे या फलकावसमोर आले. त्यांनी फटाके फोडले. त्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे आजूबाजूच्या लोकांचा मोठा जमाव जमला. त्यांना पाहून चौघानीं पळ काढला. जमावाने पाठलाग करून दोघांना पकडले. भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार का करता अशी विचारणा केली आणि दोघांना चोप दिला. त्यानतंर त्यांना एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. तेथेही हात पाय दोरीने बांधून जबर मारहाण करण्यात आली. याची माहिती शहरभर पसरली होती. मार्केट पोलिसांनाही याची माहिती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत जखमी तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील महंमदसफेहच्या डोक्याला दुखापत झाली.

तर आयुबला किरकोळ मार लागला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची चौथी घटना आहे. सौदंती येथील एका शिक्षिकेने सोशल मिडीयावर पाकिस्तानचा जयजयकार करण्यासोबतच स्टेटस ठेवले होते. त्यामुळे तिचे घर पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. २३ फेब्रुवारी रोडी रामदुर्ग येथेही आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.