Paranjape Builders Latest News | बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुची 12 तासांहून अधिक काळ चौकशी सुरुच; फिर्यादीमध्ये आणखी तिघांची नावे, सखोल तपास सुरू

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – (Paranjape Builders) परांजपे बिल्डर कुटुंबाच्या (Paranjape Builders) विलेपार्ले येथील जमिनीच्या प्लॉटप्रकरणी गुरुवारी रात्री पुण्यात विलेपार्ले पोलिसांनी नामांकित बांधकाम व्यवसायिक श्रीकांत आणि शशांक परांजपे यांना ताब्यात घेतले. त्यांना मुंबईला नेण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत त्यांची चौकशीच करण्यात येत आहे. 12 तासापेक्षा अधिककाळ त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान, परांजपे बिल्डर बंधूंना (Paranjape Builders) मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय 63) Srikanth Purushottam Paranjape आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय 59) Shashank Purushottam Paranjape अशी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी रात्री अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी परांजपे बंधुंना गुरुवारी रात्री ताब्यात घेतल्याने बांधकाम व्यवसायात एकच खळबळ उडाली आहे.

Builder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत

याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ यांनी ‘पोलीसनामा’शी (Policenama Online) बोलताना सांगितले की,
दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी परांजपे बंधुंना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. त्यांना अटक केली जाणार का असे विचारता, त्याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Builder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत

याबाबत पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले की, श्रीकांत आणि शशांक पराजंपे यांच्या विरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला,
त्याबाबत आम्ही त्यांना अटक करण्यासाठी नाही तर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुराव्यांची तपासणी करुन त्याबाबत पुढील कारवाई केली जाईल.
70 वर्षाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीत माधव परांजपे आणि राघवेंद्र पाठक यांचीही नावे आहेत.
यापूर्वी संबंधितांवर (आरोपींवर) जानेवारी 2020 मध्ये दाखल झालेल्या फसवणूक आणि विश्वासघाताच्या केसप्रमाणेच हीही केस आहे.
यातील पुरावे तपासण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.

परांजपे कुटुंबाच्या विलेपार्ले येथील जमिनीच्या प्लॉटप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहरचना सोसायट्यांचे उद्गाते असलेल्या भाऊराव परांजपे यांच्या वसुंधरा डोंगरे (वय 70) या कन्या आहेत. श्रीकांत आणि शंशाक परांजपे यांचे वडिल पुरुषोत्तम हे वसुंधरा यांचे काका होते.
वसुंधरा डोंगरे यांनी आपले सख्खे बंधु जयंत परांजपे यांच्याविरुद्ध ही तक्रार दिली आहे.
आपल्या आई सरस्वती परांजपे यांच्या खोट्या सह्या करुन आपला मालमत्तेवरील नैसर्गिक हक्क नाकारला गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
डोंगरे कुटुंबियांनी माहिती अधिकारात माहिती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Titel : Paranjape Builders Latest News | A 70-year-old woman lodged a case against builders Shrikant Paranjape and Shashank Paranjape alleging cheating and forgery, late last night. inquiry is going on from last 12 hours

 

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST