परभणीत काँग्रेस कार्यकर्त्यांचे निदर्शन

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. या मागणीसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या असूनही केंद्र सरकार जेईई आणि एनईईटी परीक्षा घेण्यावर जोर देत आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कॉंग्रेसने राज्यभर निदर्शने केली. सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू इच्छित आहे का असा सवाल त्यांनी केला. परभणी येथे जेईई आणि एनईईटी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी मुख्य टपाल कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. पक्ष पदाधिकारी; काँग्रेस कार्यकर्ते, एनएसयुआय कार्यकर्ते, नगरसेवक आदींनी सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.