गंगाखेड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी परभवणीच्या गंगाखेड मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे कारागृहातून निवडणूक लढवून देखील रत्नाकर गुट्टेंनी ही निवडणूक जिंकली. शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन फसवणूक केल्या प्रकरणात रत्नाकर गुट्टे गंगाखेड शुगरचे चेअरमन आणि उद्योजक आहेत. गुट्टे हे मागील चार महिन्यांपासून परभणीच्या तुरुंगात आहेत.
रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा 18 हजार 896 मतांनी पराभव केला. या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून विशाल कदम, राष्ट्रवादीकडून मधुसुदन केंद्रे आणि अपक्ष संतोष मुरकुटे आणि सीतीराम घनदाट अशी बहुरंगी लढत झाली होती. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे जावई आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांभाळली. गंगाखेडची जागा रासप कडे असताना शिवसेनेने या ठिकाणी उमेदवार उभा केला.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
1. विशाल विजयकुमार कदम (शिवसेना) – 45939
2. मधुसुदन माणीकराव केंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 5262
3. देवराव गणपतराव खंदारे (बहुजन समाज पार्टी) – 471
4. विठ्ठल कोंडीबा जावडे (मनसे) – 2273
5. करुणाबाई कुंदगीर ( वंचित बहुजन आघाडी) -16169
6. गजानन दिगंबर गिरी (बहुजन विकास आघाडी) – 532
7. रत्नाकर माणीकराव गुट्टे (रासप) – 47280 विजयी झालेले उमेदवार
8. सखाराम ग्यानबा बोबडे (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी) -449
9. अजहर शेख (अपक्ष) – 390
10. गजानन भाऊराव मारगेल (अपक्ष) – 328
11. तुकाराम व्हावले (अपक्ष) – 605
12. बालाजी मोहीत सागर (अपक्ष) – 527
13. सिताराम चिमाजी घानदट (अपक्ष) – 28661
14.अॅड. संजीव प्रधान (अपक्ष) – 956
15. संतोष मुरकुटे (अपक्ष) – 10187
16. NOTA – 1005
टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –