Coronavirus : परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीत आणखी एक ‘कोरोना’चा रुग्ण सापडला

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर मृतांची संख्या देखील मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस नवीन रुग्णांची भर पडत आहे. परळच्या बेस्ट वसाहतीत आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे. कंडक्टरच्या जावयालाच कोरोनाची लागण झाल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे परळच्या बेस्ट वसाहतीतील कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या इमारतीत रहात असलेल्या कंडक्टरच्या जावयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही इमारत प्रशासनाकडून सील करण्यात आली असून इमारतीमधील 60 कुटुंबांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. कोरनाची लागण झालेले हे चार जण कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती घेतली जात आहे. या इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने ही इमारत जंतुनाशकाद्वारे निर्जंतूक करण्यात आली आहे.

काल परळच्या बेस्ट वसाहतीमध्ये दोन महिलांना कोरोनाची लागण झाली. या दोघी मायलेकी असून संबंधित विवाहिता आपल्या मुलीसह माहेरी आली होती. या महिलेच्या पतीस यापूर्वी कोरनाची लागण झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. एकाच कुटूंबातील हे तिन्ही रुग्ण असून, त्यातील पती व पत्नी हे दोन्ही बेस्टचे कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज राज्यात 23 नवे रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 891 वर गेली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like