पराठे की फेस मास्क ! सोशल मिडीयावर व्हायरल होतोय ‘कोरोना’ बोंडा आणि डोसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मदुरै शहराचे पराठे बरेच प्रसिद्ध आहेत. कोरोना कालावधी आणि लॉकडाऊन दरम्यान, मदुराईमधील एका रेस्टॉरंटने मदुरैच्या खाण्यापिण्याची आणि संस्कृतीच्या माध्यमातून या कोरोना साथीच्या विषयाविरूद्ध जागरूकता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. टेंपल सिटी रेस्टॉरंटचे मालक के.एल.कुमार यांनी कोरोना विषाणूपासून बचावासाठी जनजागृती करण्यासाठी चेहऱ्याच्या मास्कच्या आकाराचे पराठे बनवले आहेत. हे पराठे त्यांच्या आकारामुळे इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. मदुरै येथील कुमार यांनी टीओआयला सांगितले की, कोरोना काळात प्रत्येकाने फेस मास्क घालणे बंधनकारक आहे.

अशा कठीण काळातही मी काही लोकांना हे नियम पाळताना पाहिले आहे. अशा परिस्थितीत मी या बाबतीत काही जागरूकता पसरवू इच्छितो जेणेकरुन ते त्यांचा चेहरा कव्हर करतील. त्यांनी सांगितले की, या मास्क पराठेची किंमत, उर्वरित पराठे प्रमाणे प्रति व्यक्ती 50 रुपये आहे. आमचे उद्दीष्ट हे नाही की, लोक फक्त या मास्क पराठ्यासोबत आपला सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करावा उलट त्याद्वारे फेस मास्क कॅरी करण्याची सवय लोकानी लागावी.

कुणी मास्क न घालता त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आला तर ते त्यांना विनामूल्य मास्क गिफ्ट करतात असेही कुमार यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, कोरोना काळात ते फक्त संध्याकाळीच आपले दुकान उघडत होते, परंतु आता पराठेचे ऑर्डर अधिक येऊ लागले आहेत, तर सकाळच्या नाश्त्यातही तो रेस्टॉरंट उघडत आहे. कुमार म्हणाले की, फेस मास्क पराठे सोडून ते लोकांसाठी कोरोना व्हायरस आकाराचे रवा डोसा आणि बोंडादेखील बनवत आहेत. ते म्हणाले की कोरोनाविरूद्धच्या या लढाईचा छोटा भाग असल्याचा आम्हाला आनंद आहे.