शरद पवार यांच्या भेटीसाठी पार्थ ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, ‘त्या’ चर्चेवर पडदा पडणार ?

मुंबई,पोलीसनामा ऑनलाईन :  दि. 13 ऑगस्ट : शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातील आजोबा नातू यांच्यातील प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चीले जात आहे. मात्र, यावर आता पडदा पडणार असल्याचे समजत आहे. कारण, पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सवसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांव्दारे थेट सुनावले होते. त्यामुळे याला राजकीय वर्तुळात अधिक महत्व देण्यात आले. तसेच हा मुद्दा अधिक प्रमाणात चर्चीला गेला. आता यावर पडदा पडणार असल्याचेही समजत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल झालेत.

पार्थ पवार हे ’इमॅच्युअर’आहे, असे शरद पवार म्हणाले होते. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बुधवारी बैठक झाली. यानंतर या बैठकीबाबत अजित पवार काहीच बोलले नाहीत. त्यानंतर आता पार्थ पवार हे थेट शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांची कन्या सुप्रीया सुळे ह्या देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पार्थ पवार हे चर्चेत आले आहेत. पारनेरमधील शिवसेनेचे आमदार फोडल्यापासून पार्थ पवार हे चर्चेचा मुद्दा बनलेत. हा विषय मिटत नाही तोच राम मंदिराच्या मुद्द्यावर जाहीर समर्थन करणारं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयव्दारे चौकशी करावी, अशी पार्थ पवारने मागणी केली होती.

पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीत गटतट पडले की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावर अखेर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला. अन् पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत, असे थेटपणे शरद पवार यांनी पार्थ पवारला जाहीरपणे सुनावले.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी शरद पवार यांनी उघडपणे नातू पार्थ पवारला फटकारले. त्यानंतर अजित पवार हे बुधवारी तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी गेले होते. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून यावर पडदा पडणार असल्याचे समजत आहे.