पर्वती मतदारसंघाचा वचननामा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे आयोजित व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या वचनानामाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपट ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उद्योगपती विठ्ठल मणियार, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्षपद फतेचंद रांका, फामचे उपाध्यक्ष राजेश शहा, राजेश फुलपगार, खासदार वंदना चव्हाण, माजी खासदार रजनी पाटील, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार यांच्यासह आघाडीचे उमेदवार अश्विनी कदम, रमेश बागवे, दत्ता बहिरट, चेतन तुपे, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
Sharad Pawar
पवार म्हणाले, दिवसेंदिवस प्रश्न वाढतच असून आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहे. गेल्या काही राज्यात महिन्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील आर्थिक मंदी घालविण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाने पाऊले उचलणे आणि गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र आज या विश्वासाला तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील अनेक लहान मोठ्या कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. लाखोंच्या नोकऱ्या जात असल्याने त्या-त्या भागातील व्यापारावर व इतर गोष्टींवर परिणाम होत आहे.

आज व्यापारामध्ये मध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी अभ्यासू सुशिक्षित आणि खऱ्या अर्थाने समाजाशी नाळ असणारे उमेदवार निवडून ही काळाची गरज झाली आहे. या भागातील विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्षने अशाच प्रकारचे उमेदवार उभे केले आहे. व्यापारी वर्गाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांना निवडून आणावे असे आवाहन केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी