‘राजगृह’वर हल्ला : पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी कडून निवेदन

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई येथील राजगृहावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे याबद्दल ठिक-ठिकाणी निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे. ( सात जुलै ) रोजी राजगृहावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येत आहे महापुरुषांच्या स्मारकावरील हा हल्ला इतिहासातील काळीकुट्ट घटना ठरत आहे राजगृहावरील हल्ल्याचा हेतू कळून येण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी प्रशासनाला निवेदन देऊन केली जात आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ, सेलू, मानवत, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा, आदी ठिकाणी राजगृहावर झालेल्या हल्ल्या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले जात आहे.

पाथरी येथे ( आठ जुलै ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी कडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा सचिव दीपक गवारे, पाथरी शहराध्यक्ष शेख खालेद, न.प. सदस्य अजय सिंह पाथरीकर न. प. सदस्य सतीश वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष विष्णू काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तर वंचितने दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पोटभरे, जिल्हा सदस्य महारुद्र तुपे, पाथरी तालुका अध्यक्ष मो. खुर्शिद शेख, श्यामराव ढवळे, सिद्धांत भाग्यवंत, आवडाजी ढवळे, ज्ञानेश्वर ताल्डे, आनंत कांबळे, भास्करराव साळवे, दिलीप मोरे, महादेव गायकवाड, कुमार भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.