महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे निधन, आइनस्टाइनच्या सिद्धांताला दिलं होतं ‘आव्हान’

पटना (बिहार) : वृत्तसंस्था – महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे आज पटना येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ते 74 वर्षांचे होते. वशिष्ठ नारायण सिंह 40 वर्षांपासून ‘सिजोफ्रेनिया’ या मानसिक आजाराने त्रस्त होते.

आइनस्टाइनच्या सिद्धांताला दिले होते आव्हान

गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांनी महान शास्त्रज्ञ आइनस्टाइनच्या सापेक्षकतेच्या सिद्धांताला आव्हान दिले होते. जेव्हा नासामध्ये अपोलो सुरू होण्यापूर्वी काही काळ 31 कॉम्प्युटर काही वेळासाठी बंद झाले होते, तेव्हा कॉम्प्युटर दुरुस्त झाल्यानंतर कॉम्प्युटर आणि त्यांचे कॉम्प्युटरचे कॅल्क्युलेशन सारखेच होते.

1969 मध्ये कॅलिफोर्निया येथून पीएचडी

पटना सायन्स कॉलेजमध्ये असताना कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक जॉन केली यांची नजर वसिष्ठ नारायण सिंह यांच्यावर पडली. ते 1965 मध्ये अमेरिकेत गेले. त्यांनी 1969 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी मिळविली. त्यानंतर ते वॉशिंग्टन विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक झाले. ते नासामध्येही कार्यरत होते, परंतु 1971 मध्ये ते भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर वसिष्ठ नारायण यांनी आयआयटी कानपूर, आयआयटी बॉम्बे आणि आयएसआय कोलकाता येथे नोकरी केली. 1973 मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर लगेचच त्यांना मानसिक आजार स्किझोफ्रेनियाने ग्रासले. या आजाराने ग्रस्त झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. मांझी म्हणाले, वशिष्ठ नारायण सिंह यांच्या मृत्यूमुळे समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like