दत्तवाडी अजिंक्यपद स्पर्धा : पै. चेतन कंधारे यांनी पटकावले अजिंक्यपद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अखिल दत्तवाडी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सह्याद्री संकूलच्या पैलवान चेतन कंधारे यांनी अजिंक्यपद पटकावले तर अक्षय चोरगे यांनी उपविजेतेपद पटकावले आहे. विजेत्या मल्लाला चांदीची गदा ॲड. रोहित शेंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी वस्ताद नामदेवराव गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. मागील ९ वर्षांपासून सलग या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाची कुस्ती स्पर्धा तपोभूमी मैदान येथे पार पडली. तर याप्रसंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजक पै. निलेश गायकवाड, आमदार भीमराव अण्णा तापकिर, सत्यवानजी उभे, बाळासाहेब दाभेकर, रमेश बाप्पू कोंडे, सचिन दोडके, विनायक हनमघर, योगेश गोगावले, धिरज घाटे, विशाल धनवडे, किरण बारटक्के, हेमंत रासने आदी उपस्थित होते. त्यासोबतच विविध मान्यवरांबरोबरच कुस्ती शौकिन यावेळी उपस्थित होते.

Loading...
You might also like