अनैतिक संबंध ठेवण्याच्या आरोपावरून पंचायतीने तरुण-तरुणीला दिली ही ‘घाणेरडी’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपर्यंत तुम्ही शिक्षेचे अनेक मोठे मोठे प्रकार पहिले असतील मात्र एका गावातील पंचायतीने एका तरुण तरुणीला दिलेली शिक्षा पाहून देशात लोकशाही आहे की नाही असे तुम्हाला वाटेल. अनैतिक संबंध ठेवल्यामुळे पंचायतीने एका तरुण आणि तरुणीला जबर मारहाण केली आणि सर्वांसमोर थुंक चाटायला लावली. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील एका गावातील हा धक्कादायक प्रकार आहे.

वरुणा नावाच्या गावातील पंचायतीने तरुण आणि तरुणीला मारहाण केली आणि एवढ्यावरच पंचायत थांबली नाही तर एकमेकांची थुंकी चाटण्याची शिक्षा देखील या दोघांना फर्मावण्यात आली. झालेल्या मारहाणीत महिलेचा हाथ तुटला तर तरुणाच्या खांद्याला जखम झाली. या दोंघांमध्ये अनैतिक संबंध आहेत म्हणून पंचायतीने ही शिक्षा सुनावल्याचे समजते.

पीडित मनीष यादव ने सांगितले की, शेतात ट्रॅक्टरने काम करत असताना त्यांचा मोबाइल फोन डिस्चार्ज झाला तेव्हा ते फोन चार्ज करण्यासाठी एका महिलेच्या घरी पोहचले. त्यानंतर गावातील काही लोकांनी त्यांना त्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून मारहाण केली. त्यानंतर त्या मारहाणीचा व्हिडीओ देखील संपूर्ण शहरात व्हायरल केला गेला. पोलीस सध्या त्या व्हिडिओतील मारहाण करणाऱ्या व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Visit : Policenama.com