मोठी बातमी : जनतेनं राज ठाकरे यांचा ‘विचार’ करायला हवा : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षातून भाजपमध्ये आलेले नेते भाजपची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, असे भाकित नितीन गडकरी यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. काळाच्या ओघात पक्ष विस्तार करायचा असतो. तेव्हा माणसं जोडावी लागतात.

नागपूर भाजपमध्येही अनेकजण काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यावेळी काँग्रेस मोठा पक्ष होता. बाहेरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली, त्याप्रमाणे ते वागले, असे ही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना गडकरी म्हणाले, राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत. लोक त्यांना प्रतिसादही देतात. मात्र, त्यांच्या पक्षाची रणनिती चुकली आहे. राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाचा विजय जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच ताकदवान विरोधी पक्ष असणे गरजेचे असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करत असते. त्यामुळे लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांना विरोधात बसण्याची इच्छा आहे ही चांगली गोष्ट आहे. जनतेने त्यांचा विचार करायला हवा, असे सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी