जाणून घ्या : काय होतं प्रकरण ज्यामुळे मुशर्रफ यांना सुनावला ‘मृत्यूदंड’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या प्रकरणात पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मुशर्रफ यांच्यावरील आरोपांकरिता स्थापन केलेल्या विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात पेशावर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ अकबर आणि सिंध उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाहिद करीम यांच्या समावेश असलेल्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे.

परवेझ मुशर्रफ यांच्या तीन महिन्यांपासून या प्रकरणातील तक्रारी, नोंदी, युक्तिवाद आणि तथ्यांचे विश्लेषण करून आपल्या निर्णयामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या घटनेतील कलम ६ नुसार मुशर्रफ यांना उच्चद्रोहासाठी दोषी मानले गेले आहे. हा निर्णय बहुमताच्या जोरावर घेण्यात आला आहे. यात तीन न्यायाधीशांनी मुशर्रफ यांच्याविरोधात निकाल दिला आहे. यापूर्वी सोमवारी लाहोर उच्च न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांच्या देशद्रोहाच्या खटल्याला स्थगिती मिळावी या याचिकेवर सरकारला नोटीस बजावली होती, मुशर्रफ यांनी याचिकेत प्रलंबित सुनावणी आणि त्यांच्यावरील सर्व कारवाई असंवैधानिक घोषित करण्याची विनंती केली.

काय होते हे देशद्रोहाचे प्रकरण :
मिळालेल्या माहितीनुसार, परवेझ मुशर्रफ मार्च २०१६ पासून दुबईत राहत आहेत. मुशर्रफ यांच्यावर घटनेचा भंग केल्याबद्दल आणि २००७ मध्ये आणीबाणीचा नियम लागू केल्याचा आरोप आहे. २००७ साली त्यांनी एक आदेश जारी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अध्यक्ष म्हणून निवडण्यासाठी पुन्हा घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या वैधतेवर निर्णय घ्यायचा होता. हा निर्णय येण्यापूर्वीच लष्कर प्रमुखपदाची धुरा सांभाळताना पाकिस्तानात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी घेतला. त्यावेळी ते लष्करप्रमुख होते.

मुशर्रफ यांना याच प्रकरणात ३१ मार्च २०१४ रोजी दोषी ठरवण्यात आले होते. ७६ वर्षीय मुशर्रफ मार्च २०१६ मध्ये दुबईमध्ये उपचारासाठी गेले होते आणि सुरक्षा आणि आरोग्याच्या कारणास्तव सांगून ते परत आले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/