Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा आलेख चढाच ! दररोज होतेय 84 पैशांनी वाढ, व्यावसायिकांचे गणित कोलमडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच इंधन दरातील भाववाढीचे समर्थन केल्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलमधील भाववाढ सातत्याने सुरुच ठेवली असून त्यांच्यावर आता कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा लिटरमागे ८४ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर आता ११६.२० प्रति लिटर झाले आहे.
पॉवर पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता १२०.७० रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरातही प्रति लिटर ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात डिझेलचा दर ९८.९४ रुपये झाला आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

राज्यातील अनेक शहरात डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. पेट्रोल, डिझेलची दररोज होणारी दरवाढ लक्षात घेता डिझेलचे दर २ एप्रिल रोजी पुण्यात शंभरी पार करेल. या अगोदर १६ ऑक्टोंबर २०२१ रोजी पुण्यात डिझेलचा दर १००.०८रुपये लिटर झाला होता. तो ३ नोव्हेंबरला१०४.४६ रुपये लिटर झाला होता. त्याचवेळी पेट्रोल ११५.३३ रुपये लिटर होते. त्यानंतर दिवाळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर कमी केल्याने ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल १०९.५० रुपये व डिझेल ९२.५० रुपये लिटर झाला होता.

जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर (Crude Oil Price) कितीही वाढले तरी चार राज्यातील निवडणुकामुळे तेल कंपन्यांना देशातील इंधनाचे दर वाढविण्यावर निर्बंध घातले होते. या निवडणुक काळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी आता दररोज वेगाने पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले जात आहे.

web title :  Petrol Diesel Price Hike Pune | Petrol, diesel price hike graph goes up! An increase of 84 paise per day, the maths of the professionals collapsed 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा