Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फेरा सुरुच, 10 दिवसात पेट्रोल तब्बल 2.37 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. (Petrol Diesel Price Pune)

पेट्रोलच्या किंमतीत आज लिटरमागे 18 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यातील पेट्रोलचा दर 109.62 रुपये लिटर इतका झाला आहे. (Petrol Diesel Price Pune) डिझेलचे दर  आज प्रति लिटर तब्बल 32 पैशांनी महागले आहे. आज पुण्यात डिझेलचा दर 98.63 रुपये लिटर इतका झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरातही अशीच वाढ करण्यात आली असून आज पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर 113.30 रुपये लिटर इतका झाला आहे. 10 दिवसात पेट्रोलमध्ये 2.37 रुपयांची वाढ ज्या प्रमाणे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दररोज पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत गेली. त्यापेक्षा अधिक वेगाने सध्या इंधनाच्या दरात भाववाढ होत आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे तब्बल 2.37 रुपयांची वाढ झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील पेट्रोलचा दर प्रतिलिटर 107.25 रुपये होता तो आज  109.62 रुपयांवर गेला आहे. डिझेलच्या दरात गेल्या 10 दिवसात तब्बल 3.06 रुपयांनी वाढ झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी डिझेलचा प्रति लिटर 95..57 रुपये या भावाने विक्री होत होती. त्याच डिझेलचा दर आज 98.63 रुपयांवर गेला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar in Traffic Jam | पुण्यातील पावसाचा अजित पवारांना फटका, वाहतूक कोंडीत अडकले अन्… (व्हिडिओ)

दमदार इंजिन असलेली Royal Enfield Bullet 500 येथे मिळेल 75 हजारात, कंपनीकडून मिळेल 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान

Back pain | पाठदुखीकडे कधीही करू नका दुर्लक्ष, असू शकतो ‘हा’ असाध्य आजार; जाणून घ्या

Pimpri Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणखी एका पोलीस ठाण्याला मान्यता

Param Bir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सस्पेन्स कायम ! क्राइम ब्रँचनं उचललं ‘हे’ पाऊल

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये