PIB Fact Check : केंद्र सरकार शालेय पुस्तकांवर टॅक्स लावलाय ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण कुठेतरी वाचले किंवा ऐकले असेल की भारत सरकारने शालेय पुस्तकांवर कर लादला आहे. तर ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. कारण सरकारने असे कोणतेही पाऊल उचललेले नाही. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने व्हायरल झालेल्या बातमीचा इन्कार करत असे म्हटले आहे की भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. संबंधित बातमीचा तपास पीआयबी फॅक्ट चेकद्वारे करण्यात आला असून तो बनावट असल्याचे आढळले.

सत्य काय आहे? जाणून घ्या – या बातमीचा तपास केल्यावर समजले की ही बातमी बनावट आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीटमध्ये म्हटले आहे की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संदेशात केंद्र सरकारने शालेय पुस्तकांवर कर लावला असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा बनावट आहे. शालेय पाठ्य पुस्तकांवर कोणताही कर नाही.

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या धोरण/ योजना/ विभाग/ मंत्रालयांविषयी चुकीची माहिती पसरवण्यासाठी प्रतिबंधित करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. एक पीआयबी फॅक्ट चेकवर संशयित बातमीचा स्क्रीनशॉट 918799711259 नंबर वर, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल वर पाठवू शकता किंवा [email protected] वर मेल करू शकता.