मोदी सरकार मुलीच्या लग्नासाठी देतंय 40 हजार रूपये ?, जाणून घ्या ‘त्या’ मेसेजचं सत्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना आणल्या. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर आता एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज प्रधानमंत्री कन्या विवाह योजने’शी संबंधित आहे.

‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजने’च्या माध्यमातून सरकार मुलींच्या लग्नासाठी 40 हजार रुपये देणार असल्याचा (maodi-government-giving-40000-rupees-under-pradhanmantri-kanya-vivah-yojna) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य सांगितलं आहे. केंद्र सरकार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या विवाहासाठी 40 हजार देत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ बोगस असल्याची माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने (pib-fact-check) दिली आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना सरकारने सुरू केली नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.