Pimpri Accident News | पिंपरी : खासगी बस व दुचाकीची समोरासमोर धडक, महिलेचा मृत्यू
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील एका महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.16) सकाळी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवे (Mumbai Pune Highway) रोडवरील देहुगाव कमानीसमोर झाला आहे. ( Pimpri Accident News)
या अपघातात माळवाडी, देहुगाव येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत राजु सिताराम नवघरे (वय-50 रा. संत तुकाराम नगर, येलवाडी, देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Raod Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून एमएच 14 एचजी 4133 या खासगी बस चालकावर आयपीसी 279,337, 304(अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिक्युरिटी फिल्ड ऑफीसर आहेत. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन माळवाडी येथुन देहूरोड कडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीवर मृत महिला पाठिमागे बसली होती. साडेसात वाजण्याच्या सुमारास निगडी कडून भरधाव वेगात खासगी बस आली. बसचालकाने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने, बेदरकारपणे चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिली.
यामध्ये फिर्यादी यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर पडली.
यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर फिर्यादी जखमी होऊन त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी