राम कदम यांच्या बेताल वक्तव्याविरोधात मनसे,राष्ट्रवादी,काँग्रेस महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्त्यव्याचा निषेध व्यक्त करत आज मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,पिंपरी काँग्रेस महिला यांच्या वतीने राम कदम यांचा फोटो असलेल्या फलकावर जोडे मारून निषेध व्यक्त केला.यावेळी मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.यावेळी मनसे ने वेगळे आंदोलन करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिलांच्या वतीने एकत्र आंदोलन केले.

भाजपा आमदार राम कदम यांनी दहिहंडीप्रसंगी ‘मुलगी लग्नासाठी तयार नसेल, तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल,असे बेताल वक्तव्य केले होते यानंतर अवघ्या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या वर सडकून टीका होऊ लागली.तर काही तरुणींनी संताप व्यक्त करत राम कदम यांना खुल आवाहन दिले आहे.राम कदम यांच्या वक्तव्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून खरपूस समाचार घेतला जात आहे.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B005YVWXJG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95617a33-b10b-11e8-8912-69b252bd04a5′]

धिक्कार असो धिक्कार असो राम कदम यांचा धिक्कार असो,अस म्हणत राम कदम यांच्या फलकावरील फोटो ला मनसे महिला कार्यकर्त्यानी लिपस्टिक लावली.या छक्क्याच करायचं काय अश्या देखील घोषणा देण्यात आल्या.महिलांमध्ये संतापाची लाट स्पष्ट दिसत होती.प्रत्येक महिला कार्यकर्त्यानी त्यांचा फलकावर जोडे मारले.राम कदम यांची पक्ष्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

जाहिरात