दिलासादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1158 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ADV

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोक कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आज पिंपरी चिंचवड शहरातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1158 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात 29 हजार 733 रुग्ण बरे झाले आहेत.

महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 886 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 374 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या 886 रुग्णांपैकी 857 रुग्ण शहरातील असून 29 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 661 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 23 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 994 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 825 तर शहराबाहेरील 169 रुग्णांचा समावेश आहे.

ADV

शहरामध्ये सध्या 6 हजार 123 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 141 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरात गेल्या 24 तासात चिंचवड, रहाटणी, सांगवी, वाल्हेकरवाडी, चिखली, किवळे, निगडी, मोशी, काळेवाडी, भोसरी, पिंपळे सौदागर, चऱ्होली, देहुगांव, देहूरोड आणि मंचर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.