राम कदम यांच्या बेताल वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने ‘जोडे मारो’ आंदोलन

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

‘मुलगी लग्नासाठी तयार नसेल, तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल’, असे वादग्रस्त विधान करणाऱ्याआमदार राम कदम यांचा निषेध करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध करण्यात आला.

पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान आमदार राम कदम यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिलांनी राम कदमांच्या वक्तव्यासंदर्भात अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राम कदमांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
[amazon_link asins=’B01KSXQNLS,B0119ROQXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46770176-b10f-11e8-b848-b9b4e46c48e9′]
यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका उषा वाघेरे, शितल काटे, माई काटे, उषा काळे, सुलक्षणा धर, विनया तापकीर, निकीता कदम, गिता मंचरकर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयुर कलाटे, प्रवक्ते फजल शेख, निलेश पांढरकर तसेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात