‘कोरेगाव भिमा’ : पोलीस आयुक्त, विशेष महानिरीक्षक आणि ‘आयबी’ अधिकार्‍यांमध्ये ‘मिटींग’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील विजय स्तंभ मानवंदना दिनाच्या अनुषंगाने आज (मंगळवार) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्यात संयुक्त मीटिंग झाली.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि ‘आयबी’चे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. २०१८ साली घडलेली घटना लक्षात घेता उपाय योजना आणि योग्य नियोजन करण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

एक जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथे विजय स्तंभ मानवंदना दिन असतो. या ठिकाणी राज्यातील कानाकोपऱ्यातून मानवंदना देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. २०१८ मध्ये याच दिवशी या ठिकाणी मोठी घटना घडली. यामध्ये जाळपोळ, दगडफेक, लाठीचार्ज यासारखे प्रकार घडले. यामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तपासासाठी विशेष तपासी पथकाची नियुक्ती करण्यात आली. ही घटना राज्यात चांगलीच गाजली.

२०१८ ची घटना लक्षात घेता सध्या याकडे गांभीर्याने पोलीस पाहत आहे. यासाठी उपाय योजना आणि नियोजन यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी यांच्यात संयुक्त मीटिंग झाली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या मीटिंगला पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुहास वारके, केंद्रीय गुप्त वार्ता (आयबी) चे अधिकारी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व वरिष्ठ निरीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, ग्रामीणचे उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

वाहतुकीच्या उपाय योजना, संबंधीत ठिकाणी योग्य बंदोबस्त, पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या वाहनांचे नियोजन, २०१८ च्या घटनेमध्ये संशयित असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/