पुर्ववैमनस्यातून पिंपरीत युवकाचा खून, धारदार शस्त्रांनी वार करून संपवलं

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या वादाचा राग मनात धरुन चौघांनी एकावर शस्त्राने तसेच दगडी पाट्याने वार करुन खून केला. हा प्रकार विद्यानगर, चिंचवड येथे शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडला.

शंकर गोविंद सुतार (२३, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर संतोष चौगुले, अजय कांबळे, मोसीन शेख, पप्पू पवार या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नीला गोविंद सुतार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर आणि संतोष यांच्यात पूर्वीचा वाद होता. याचा राग मनात धरुन शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मंदिराच्या समोर शंकर यांच्यासोबत आरोपींनी वाद घातला. यातून आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार केले तसेच दगडी पाट्याने मारहाण केली. जखमी शंकर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.