घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक, 21 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने सराइत गुन्हेगारास अटक करुन त्याच्याकडून 21 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 11 आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पाहिजे व फरारी आरोपींचा शोध सुरु होता. एमआयडीसी, भोसरी येथे गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस शिपाई सचिन मोरे यांना माहिती मिळाली की, घरफोड्या चोऱ्या करणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार शंकर पवार उर्फ हुड्या हा देहरोड मुकाईचौक रावेत येथे येणार आहे.

सापळा रचून शंकर उर्फ हुडया मधुकर पवार (१९, रा . सोमाटणेगांव, ता . मावळ, जि . पुणे, मुळगाव, मु . पो. पेनूर, ता. मोहोळ, जि . सोलापुर) यास पकडले. त्याचेकडे चौकशी मध्ये त्याने त्याचे दोन साथीदारासह पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, वाकड, लोणवळा या भागामध्ये घरफोड्या चोऱ्या व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे चौकशी मध्ये उघड झाल्याने त्यास चाकण पोलीस ठाणे कडील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आह.

आरोपी याचेकडे पोलीस कस्टडी दरम्यान केले तपासामध्ये त्याचा अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेण्यात आले असुन त्या दोघांकडून त्यांनी चोरलेल्या दोन हुदाई वेरना कार, मोटार सायकल , एल . ई . डी . टिव्ही, होम थिएटर , लॉपटॉप , मोबईल व १३ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण २१ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चाकण, हिंजवडी, वाकड, तळेगाव एमआयडीसी, हडपसर, यवत, लोणावळा शहर येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. वाकड येथुन होन्डा सिटी कार तसेच हिंजवडी येथुन मारुती सियाज कार चोरल्या होत्या. सदर कार या संशयावरून सोलापूर ग्रामीण पोलीसांनी यापुर्वी जप्त केल्या आहेत. परंतु त्यावेळी त्यांना आरोपी मिळुन आला नव्हता. आरोपीने यवत येथुन चोरलेली मोटार सायकल ही कात्रज येथे चोरी करताना सोडून पळुन गेला होता.

आरोपी शंकर उर्फ हुड्या मधुकर पवार हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर पंढरपुर , सोलापूर शहर , सोलापुर ग्रामीण , पुणे शहर , पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड येथे एकण १० घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई . सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ , अपर पोलीस आयुक्त श्रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ , सहाय्यक पालीस आयुक्त आर . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील , पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे , तसेच पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड , रविंद्र गांवडे , शिवाजी कानडे , आप्पा लांडे , बाळु कोकाटे , अमित गायकवाड , महेंद्र तातळे , मनोजकुमार कमले . अंजनराय सोडगीर , मारुती जायभाय , प्रविण पाटील , गणेश सावंत , विशाल भोईर , विजय मोरे , सचिन मोरे , प्रमोद गर्जे , व तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे.

visit : Policenama.com