Video : जेव्हा PM मोदी बिहारच्या महिला IPS ट्रेनीला म्हणाले – ‘टेक्सटाईलमध्ये धागे जोडतात तर टेररमध्ये उकलावे लागतात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) प्रोबेशनरच्या अनेक प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हे सर्व प्रशिक्षणार्थी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी हैदराबाद येथे जमले होते. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाविषयी चर्चा केली. कार्यक्रमास उपस्थित तरुण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपले अनुभव सांगितले. या दरम्यान त्यांनी बिहारची एक प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तनुश्रीला टेक्सटाईल आणि टेररमधील फरक अगदी अनोख्या पद्धतीने समजावून सांगितला.

टेरर आणि टेक्सटाईलमध्ये काय फरक आहे?
कार्यक्रमात पंतप्रधानांशी बोलताना तनुश्रीने सर्वप्रथम सांगितले की, आपल्या टीमने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात कसे ऑपरेशन केले. यानंतर पंतप्रधानांनी तिला शिक्षण कोठून केले असे विचारले असता तनुश्रीने सांगितले की, निफ्ट गांधी नगर येथून पासआऊट आहे. यावर मोदी म्हणाले की, ‘तुम्हीही गुजरातमध्ये जाऊन आला आहात.’ मग त्यांनी विचारले, ‘टेक्सटाईल आणि टेरर… कसे पोट भरणार?’ यावर तनुश्री म्हणाली की, तिला खूप चांगले प्रशिक्षण मिळाले आहे. यानंतर मोदी म्हणाले, ‘पाहा टेक्सटाईलमध्ये धागे जोडायचे असतात आणि टेररमध्ये धागे खोलावे लागतात. त्यामुळे वेगवेगळ्या पैलूमध्ये तुम्हाला काम करावे लागेल.’

पोलिसांची ‘मानवी’ बाजू समोर आली
यावेळी मोदींनी जम्मू-काश्मीरमधील तरुणांना सुरुवातीपासूनच दहशतवादाच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी महिलांची मदत घेण्याचे आवाहन महिला पोलिस अधिकाऱ्यांना केले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये प्रोबेशनर आयपीएस अधिकाऱ्यांना ऑनलाईन संबोधित करताना मोदी म्हणाले की, जागतिक महामारी कोविड-१९ दरम्यान देशातील पोलिसांची ‘मानवी’ बाजू समोर आली आहे.

ती ‘प्रेमळ’ लोक आहेत…
एका महिला प्रोबेशन अधिकारीच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी केंद्रशासित प्रदेशातील लोकांचे कौतुक करत म्हटले की ती ‘प्रेमळ’ लोक आहेत. ते म्हणाले, ‘मी या लोकांशी खूप जोडला गेलो आहे. ते तुमच्याशी अत्यंत प्रेमळपणे वागतात… आपल्याला चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना थांबवावे लागेल. महिला हे करु शकतात.’ पंतप्रधान म्हणाले, ‘(जम्मू-काश्मीरमध्ये) आपल्या माता हे करू शकतात …. आपण जर सुरुवातीलाच असे केले, तर चांगले होईल.’