PM मोदी नेहमी ट्विंकल खन्नाच्या ट्विटर पोस्ट पाहतात, अक्षयसमोर केला ‘या’ गोष्टींचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लांबलचक मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षयने विचारलेले अनेक प्रश्न हे मोदींच्या खासगी आयुष्याशी निगडीत होते. यावेळी मोदींनी देखील त्यांच्या आयुष्यातील अनेक रोचक गोष्टी शेअर केल्या. यावेळी मोदींनी एका प्रश्नाला उत्तर देताना असेही सांगितले की, ते ट्विंकल खन्ना यांच्या ट्विटरवरील पोस्ट नेहमी पाहत असतात.

एएनआय साठी अक्षयने आपल्या मुलाखतीत मोदींना सोशल मीडियाला घेऊन प्रश्न विचारला की, तुम्ही सोशल मीडियावरील पोस्ट्स पाहता का ? यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, हो मी सोशलवरील पोस्ट्स पाहतो. अनेकदा मला यातून नवीन प्रकारची माहिती मिळते.”

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “मी तुमचं (अक्षयचं) ट्विटरही पाहतो. मी ट्विंकल खन्ना यांचंही ट्विटर पाहतो. कधी कधी मला वाटतं की, त्या माझ्यावरील जो राग ट्विटरवर व्यक्त करतात, त्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती रहात असेल.” हलक्या फुलक्या अंदाजात मोदी म्हणतात की, “त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघत असेल. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळत असेल. सुख मिळत असेल.

मोदी म्हणाले की, “तर मी अशा प्रकारे तुमच्या कामी येतो आहे. खासकरून ट्विंकल यांच्यासाठी. बहुतेक त्यांना माहित नसेल की, तिचे आजोबा चीनू भाई, यांनाही मी भेटलो आहे. तेही खूप आधी. याचं कारणंही खूपच रोचक आहे.

मोदी म्हणाले की, “गुजरातमध्ये मी एकटा पडलो होतो. याच संबंधित एका सामाजिक कार्यामुळे माझी चीनू भाई यांच्याशी भेट झाली होती. चीनू भाई यांना मुंबईतील एक मिठाई व्यापारी गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे घेऊन आले होते. त्याचवेळी आमची भेट झाली आणि आम्ही त्यावेळी गप्पाही मारल्या.” असे मोदी म्हणाले.