Twitter वर वाढली PM मोदींची ‘लोकप्रियता’, तब्बल ‘इतके’ कोटी झाली फॉलोअर्सची संख्या

नवी दिल्ली : 2009 मध्ये मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरशी जोडले गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सतत वाढत चालली आहे. पीएम मोदी ट्विटरवर सर्वात जास्त फॉलो केले जाणार्‍या नेत्यांमध्ये सहभागी आहेत. सध्या त्यांच्या ट्विटर अकाऊंटरवर फॉलोअर्सची संख्या 60 मिलियन झाली आहे. म्हणजे पीएमला भारतासह जगभरातील 6 कोटी लोक फॉलो करतात, तर पीएम स्वत: 2354 लोकांना फॉलो करतात.

सप्टेंबर 2019 पर्यंत ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना 5 कोटी लोक फॉलो करत होते. जे आता 6 कोटी झाले आहेत. याचा अर्थ केवळ 10 महिन्यातच ट्विटरवर 1 कोटी लोकांनी त्यांना फॉलो केला आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ट्विटरवर 2 कोटी 16 लाख फॉलोअर आहेत. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 1 कोटी 5 लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात.

ट्विटरवर सर्वात जास्त लोकप्रिय नेत्यांमध्ये सर्वात वर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहेत. ओबामा यांच्या ट्विटरवर 120.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, म्हणजे त्यांना 12 कोटी लोक फॉलो करत आहेत. दुसर्‍या नंबरवर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर 83.7 मिलियन म्हणजे 8 कोटी 37 लाख लोक फॉलो करत आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर 52 लाख लोक फॉलो करत आहेत. राहुल एप्रिल 2015 मध्ये ट्विटरवर जोडले गेले. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये ट्विटरशी जोडले गेलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांचे ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 25 लाख (2.5 मिलियन) आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 करोड 99 लाख लोक फॉलो करत आहेत.