योग साधक संकटामध्ये कधीही धैर्य सोडत नाही, आपलं काम व्यवस्थितरित्या करणं देखील योग : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – अंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, योग साधक कधीही संकटात धैर्य गमावत नाहीत. योगचा अर्थ आहे – समत्वम योग उच्यते. अर्थात, अनुकूलता-प्रतिकूलता, सफलता-विफलता, सुख-संकट, प्रत्येक परिस्थितीत समान राहाणे, ठाम राहण्याचे नावच योग आहे. गीतामध्ये भगवान कृष्णाने योगची व्याख्या करताना म्हटले आहे – ‘योगः कर्मसु कौशलम अर्थात, कर्माची कुशलता म्हणजेच योग आहे.

पीएम मोदी यांनी म्हटले, जेव्हा योगच्या माध्यमातून समस्यांवर मार्ग काढणे आणि विश्व कल्याणाबाबत बोलतो, तेव्हा मी योगेश्वर कृष्णाच्या कर्मयोगाचे सुद्धा पुनःस्मरण करतो.

पंतप्रधानांनी म्हटले की, आपल्या येथे म्हटले गेले आहे की –

युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु।

युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा॥

अर्थात योग्य खाणे-पिणे, योग्यप्रकारे खेळणे, उठणे-झोपणे यासारख्या सवयी, आणि आपली कर्तव्य योग्य प्रकारे करणे हा योग आहे.

पीएम मोदी म्हणाले, आपल्या येथे निष्काम कर्म कोणत्याही स्वार्थाशिवाय, मदत करण्याची भावना, यास योग म्हटले आहे. कर्मयोगाची ही भावना भारताच्या नसानसात भिनली आहे. एक सजग नागरिक म्हणून आपण कुटुंब आणि समाजाच्या रूपात एकजुट होऊन पुढे जाऊ. आपण प्रयत्न करूयात की, घरी योग अणि कुटुंबासोबत योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवूयात. आपण नक्की यशस्वी होऊ.

कोरोनाशी लढण्यासाठी उपयोगी योग

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी योग उपयुक्त ठरत आहे. देशाला संबोधित करताना ते म्हणाले, सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस एकतेचा दिवस आहे. हा दिवस सार्वभौम, बंधुत्वाचा संदेश देणारा आहे. जेव्हा कुटुंबातील सर्वजण योगाद्वारे एकत्र येतात तेव्हा संपूर्ण शरीरात ऊर्जा संचारते.

पंतप्रधान म्हणाले, म्हणून यावेळचा योग दिनदेखील भावनात्मक योगासाठीचा दिवस आहे, आपले संबंध वाढवण्याचा देखील एक दिवस आहे. हा विश्व बंधुत्वाचा दिवस आहे. जो जोडतो, एकत्र आणतो तोच योग आहे. जो अंतर कमी करतो तोच योग आहे. कौटुंबिक प्रेम वाढवण्याचा हा दिवस आहे.

पंतप्रधान म्हणाले की, कोरोनामुळे जगाला योगाची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाटत आहे. जर आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत असेल या रोगाचा पराभव करू शकता. खुप सोपे आहे. अनेक आसने आहेत, जी माझ्या शरीराची ताकद वाढवतात. कोरोना आपल्या श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. प्राणायाम या आजाराशी लढायला मदत करतो. परंतु, प्राणायाम अनेक प्रकारचे आहेत.

पीएम मोदी म्हणाले की, कोरोना व्हायरस श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. आपली श्वसन यंत्रणा बळकट करण्याचा सर्वात उपयुक्त मार्ग म्हणजे प्राणायाम. म्हणजेच ब्रीदींग एक्सरसाईज.

दररोज प्राणायाम करा

पंतप्रधान म्हणाले, तुम्ही रोजच्या व्यायामध्ये प्राणायामचा समावेश करा. अनुलोम-विलामसह दुसर्‍या प्राणायम पद्धतीसुद्धा शिकून घ्या. स्वामी विवेकानंद म्हणत असत की, एक आदर्श व्यक्ती तो आहे जो अतिशय शांत निर्जनमध्येही सक्रिय असतो आणि अत्यंत गतिशील असतानाही शांतता अनुभवतो. ही कोणत्याही व्यक्तीची उत्तम क्षमता आहे.

यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. कोरोनामुळे, लोक एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि घरी योग दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित केला जात आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 पासून साजरा केला जात आहे. 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून 2015 ला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केले.