पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Narendra Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. 6) पुणे दौऱ्यावर येत आहेत. सत्ताधारी भाजपकडून (BJP) मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी (PM Narendra Modi Pune Visit) करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी ज्या मार्गावरुन जाणार आहेत. तेथील रस्ते दुरुस्त करण्यासोबतच अतिक्रमण हटवणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिका प्रशासकीय यंत्रणा (PMC Administration) दिवसरात्र काम करत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या (PMC) आवारातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, त्यानंतर ते गरवारे महाविद्यालय (Garware College) ते आनंदनगर (Anand Nagar) असा मेट्रो प्रवास (Pune Metro Travel) व त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोथरुड येथील एमआयटी कॉलेजच्या (MIT College) मैदानावर पंतप्रधानांची सभा व इतर ऑनलाइन उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. (PM Narendra Modi Pune Visit)
या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale), जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी (Satoshi Suzuki), केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव तसेच राज्याचे मुख्य सचिवांसह इतर उच्चपदस्थ अधिकारी,’महामेट्रो’चे (Mahametro) ब्रिजेश दीक्षित (Brijesh Dixit), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), शहरातील सर्व खासदार, आमदार यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) यांच्यात सुरु असलेल्या शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
असा असेल पंतप्रधानांचा दौरा
– सकाळी 11 वाजता लोहगाव विमानतळावर आगमन
– हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय मैदान
– पुणे महापालिका भवन येथे शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन
– गरवारे मेट्रो उद्घाटन
– मेट्रोने आनंदनगर पर्यंत प्रवास
– एमआयटी कॉलेज मैदान येथे जाहीर सभा
– हेलिकॉप्टरने लव्हळे सिंबायोसिस कॉलेज येथे भेट
– दुपारी 2 वाजता दिल्लाकडे रवाना
Web Title :- PM Narendra Modi Pune Visit | will ncp sharad pawar and cm uddhav thackeray be present to welcome pm narendra modi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Post Office Saving Scheme | दर महिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक
Blood Sugar | डायबिटीजमध्ये द्राक्ष खाल्याने ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य