PM मोदींचा प्रोटोकॉल डॉ. अमोल कोल्हेंची सभा रोखु शकला नाही !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा असल्याने व ते लोहगाव विमानतळावर येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे हेलिकाॅप्टर तसेच काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विमानाला पुण्यात उतरण्यास एअर ट्रॉफिक कंट्रोलने परवानगी नाकारली. मात्र, अमोल कोल्हे यांची सभा मात्र भाजपा रोखु शकले नाही.

अमोल कोल्हे यांची भोसरी आणि चिंचवड येथे सभा होती. मात्र, त्यांच्या हेलिकाॅप्टरला उतरण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे ते पुण्यात येऊ शकले नाही. सभा सुरु झाली होती पण ते उपस्थित राहू शकत नव्हते. तेव्हा त्यांनी चांदवडजवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून चक्क मोबाईलवरुन संवाद साधायला सुरुवात केली. सभेच्या ठिकाणी असलेल्या नेत्यांनी त्यांच्याकडील मोबाईल माईक समोर धरुन तो मतदारांना ऐकविण्यास सुरुवात केली.

चिंचवड येथील मतदारांशी त्यांनी मोबाईलवरुन संवाद साधला. पाठोपाठ काही वेळाने त्यांनी भोसरी येथील सभेला जमलेल्या मतदारांशी अशाच पद्धतीने संवाद साधला. भाजपाने पंतप्रधान मोदी यांच्या प्रोटोकॉलचे कारण देत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी हिंमत न हारता थेट मोबाईलवरुन आपले भाषण करुन त्यातून मार्ग काढलाच. अमोल कोल्हे यांच्या या मोबाईल भाषणाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या