पोलिसांची व्यापाऱ्याला मारहाण, पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पैसे देण्याचा वाद पोलिसांत गेला. पैसे नंतर देतो असे म्हटल्याने पोलिसांनी सीसीटिव्ही बंद करून आपल्याला मारहाण केल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. दरम्यान व्यापाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अमजद खान, अफजल खान असे तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अजमद खान यांची मोरगाव येथील भिला पाटील, कर्जोद येथील शेख हनिफ शेख वाहेद यांच्यासोबत भागीदारी आहे. दरम्यान त्यांना भिका पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यातून २५ एप्रिल रोजी फोन केला. त्यानंतर ते चुलत भाऊ व मित्रासोबत गेले. त्यावेळी रसलपुर येथील सुरेश धनके यांनी काही तक्रार केली होती. पोलिस निरीक्षक पाटील यांनी धनके यांचे जे पैसे घेतले असतील ते देऊन टाकण्यास त्यांना सांगितले. त्यानंतर तिघांनीही पैसे नंतर देऊ असे सांगितले. त्यावरून पोलीस निरीक्षकांनी तिघा व्यापाऱ्यांना ठोकून काढा असे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा बंद करून त्यांना मराहाण केली. त्यात खान बेशुद्ध झाले. कर्मचाऱ्यांनी त्यांना रावेर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्याजवळील ३० हजार रुपये काढून घेतले. अशी तक्रार खान यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.